Thursday, February 6, 2025
Homeराजकीय घडामोडीनवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जेजे रुग्णालयात पोहोचेले आहेत. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -