Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाविद्यालयात असताना काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल: युवकावर गुन्हा

महाविद्यालयात असताना काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल: युवकावर गुन्हा

कराड येथील एका युवकाने सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून बदनामी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नांदलापूर (ता. कराड) येथील आकाश दिलीप शिर्के असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एक युवती एका महाविद्यालयात शिकत असताना तिची ओळख आकाश शिर्के याच्याशी झाली. यानंतर त्या युवतीसह तिच्या इतर मैत्रिणींनी शिर्के याच्याकडून फोटोसेशन केले होते. यानंतर काही कारणास्तव शिर्के व त्या युवतीच्यात दुरावा निर्माण झाला.

यामुळे आकाश शिर्केने युवतीस धमकावत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याच काळात त्याने युवतीचे फोटो तिच्या नातेवाइकांना मोबाईलवर पाठवले. यानंतरही युवतीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आकाशने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करत त्यावरून युवतीचे फोटो व्हायरल करत ते तिच्या नातेवाइकांना पाठवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर याची तक्रार आज युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार शिर्केवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -