Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रनात्यातील भावानेच घटस्फोटित महिलेवर केला अत्याचार

नात्यातील भावानेच घटस्फोटित महिलेवर केला अत्याचार

नात्यातीलच एका नराधमाने असहाय घटस्फोटित महिलेला तुझ्या मुलीसह तुझा सांभाळ करीन म्हणत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ‘ती’ गर्भवती राहिल्यानंतर मुलीला मारून टाकीन अशी धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडून पाच लाख रुपये लाटले. याप्रकरणी नात्यातील भावाविरोधात क्रांती चौक पोलिसांत २२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग ऊर्फ राहुल रामेश्वर ईप्पर (24, रा. हिरवड, ता. लोणार, सध्या रा. नंदी वाइन शॉपमागे, भोईवाडा मिल कॉर्नर) असे आरोपीचे नाव आहे.

हा प्रकार 11 जुलै 2021 ते 27 डिसेंबर 2021 दरम्यान भोईवाडा आणि समर्थनगरातील हॉटेलात घडत होता. याप्रकरणी 27 वर्षीय फिर्यादीच्या तक्रारीनुसार ती आणि आरोपी राहुल हे दूरच्या नात्यातून बहीण-भाऊ लागतात. तिचा घटस्फोट झाल्याने ती खचलेली असतानाचा फायदा घेत आरोपी राहुलने फिर्यादीला ‘आयुष्यभर तुझ्या मुलीसह तुला सांभाळेन’ असे म्हणत फिर्यादीसह तिच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला.

दरम्यान फिर्यादीला पोटगीतून मिळालेले 1 लाख 75 हजार तसेच तिच्या आईचे दागिने मोडून आलेले आणि घरातील असे पाच लाख रुपये आरोपीने घेतले. त्या कालावधीत ऑक्टोबर 2021 फिर्यादी गर्भवती राहिली, मात्र आणखी कायद्यानुसार आपले लग्न झाले नसल्याने तोपर्यंत गर्भ ठेवू नको, असे म्हणत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच आपल्या संबंधाबद्दल कोणाशी बोलशील तर तुझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमोल सोनवणे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -