शेतीला दिवसा सलग दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून राजू शेट्टी यांचं कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज या आंदोलनस्थळी भेट देऊन राजू शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ऊर्जा मंत्री नितीन राऊत तसेच ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चादेखील केली. यावेळी महावितरणकडून तीन टप्प्यात दिल्या जाणाऱ्या वीजेपैकी रात्रीच्या टप्प्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातली आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी लावून धरली. मात्र अधिकाऱ्यांनी याला तांत्रिक कारण देत असमर्थता दर्शवली. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यामधील शिष्टाईसाठीची चर्चा फिस्कटली. दरम्यान लवकरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह संबंधित घटकांची राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक बोलावणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर पूरग्रस्त आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांच्या भोळ्या चेहऱ्याला आपण फसलो. यावेळी मात्र अपेक्षित निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -