गरोदरपणात महिलांच्या शरीरात खूप बदल घडतात. हार्मोन्स बदल्यामुळे मानसिक आणि शारीरिक बदल जाणवतात. गरोदरपणातील हे 9 महिने फार महत्त्वाचे आणि नाजूक असतात. आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी (Health) पोषक आहाराची गरज असते. डॉक्टर पण महिलांना पोषण आणि सकर आहार घेण्याचा सल्ला देतात. कुटुंबातील सदस्यही गरोदर महिलेची विशेष काळजी घेतात. नारळ पाणी हे निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अँसिडिटीसाठी नारळ पाणी फायदेशीर आहे. नारळ पाण्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी आवश्यक असतात. एक कप नारळ पाणी घेतल्यास 46 कॅलरी, 9 ग्रॅम कार्ब, 3 ग्रॅम फायबर आणि 2 ग्रॅम प्रोटीन मिळतं. रोज नारळ पाणी पिण्याऱ्यास 10 टक्के व्हिटॅमिन सी, 15 टक्के मॅग्नेशियम, 17 टक्के मॅगनी, 17 टक्के पोटॅशियम, 11 टक्के सोडियम आणि 6 टक्के कॅल्शियम मिळतं. मग गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिणे फायदेशीर असतं ते आज आपण जाणून घेणार आहोत.
- गरोदरपणामुळे महिलांना मार्निंग सिकनेससाठी नारळ पाणी उत्तम असतं. या दिवसांमध्ये महिलांना उलटीचा त्रास होतो. या समस्यांवर नारळ पाणी उपयुक्त ठरतं.
- नारळ पाणी हे इम्युनिटी बूस्टर आहे. त्यामुळे नारळ पाणीचं सेवन केल्यास तणाव नाहीसा होतो. या दिवसांमध्ये जाणविणारा थकवा आणि कमजोरी दूर होते.
- नारळ पाणी रोज प्यायलाने पाचनसंस्था मजबूत राहते.
- गरोदरपणात बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी हे खूप फायदेशीर ठरतं.
- गरोदरपणामध्ये महिलांच्या शरीरात पाण्याची कमी नारळ पाणी प्यायलामुळे दूर होते.
- या दिवसांमध्ये महिलांना चक्कर येणे, डोकेदुखी होते. या समस्येवरही नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरत.