Monday, September 16, 2024
Homeब्रेकिंग2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार शाळा, बीएमसीकडून परिपत्रक जारी

2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार शाळा, बीएमसीकडून परिपत्रक जारी

मुंबईत कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहे. बीएमसीकडून यासंदर्भातील परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन बीएमसीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळा सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने  सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मुंबईतील शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. बीएमसीने परित्रक जारी करून शाळा सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. ‘बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्वच्या सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 2 मार्चपासून पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु कराव्यात, असे बीएमसीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळामुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -