Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीतब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी...

तब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं; घराबाहेर शिवसैनिक आक्रमक

काल सकाळी शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरू केली, ती अद्याप तशीचं सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या छापेमारीला आता 24 तास उलटून गेले आहेत. तरी सुध्दा त्यांची चौकशी सुरू असल्याने आयकर विभागाच्या हाती नेमकं काय सापडलं असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर आयकर विभागाकडून अद्याप कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सगळं प्रकरण गुलदस्त्यात असल्याचं समजतंय. माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या अनेक शिवसैनिकांनी ठिय्या धरला असून तिथं अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय सुरू आहे याची जराशी कुणकुण देखील कुणाला नाही. यशवंत जाधव यांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण सध्या अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची शुक्रवारी सकाळपासून छापेमारी सुरूच आहे, त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं उपस्थित शिवसैनिकांना स्थानिक पोलिसांनी त्यांना समझावून शांत केले, रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून असल्याची माहिती मिळाली आहे. छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय काय लागलं ? हे अजून ही गुलदस्त्यातच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -