Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडी"ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही," विनायक मेटे यांचा इशारा

“ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही,” विनायक मेटे यांचा इशारा

मराठा आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपश इतर नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून आज शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकावर टीका केली. विशेष राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा महाविकास आघाडी ठाकरे सरकारचा मूर्खपणाचा निर्णय आहे. हा आयोग नेमून मराठा समाजाला भुलवण्याचे, झुलवण्याचे काम करत आहे. ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा मेटे यांनी दिला.

शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार मेटेयांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजासाठी ठाकरे सरकारने एकही चांगला निर्णय घेतला नाही. या सरकारने मराठा समजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठा समाज आता रस्त्यावर उतरू लागला आहे. याला हे सरकारच जबाबदार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आयोग स्थापन करण्याबाबत घेतलेला हा निर्णय मूर्खपणाचा आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात राज्य मागासवर्ग आयोग असताना दुसरा मागासवर्ग आयोग स्थापन करता येत नाही. ओबीसी आरक्षण प्रश्नी कोर्टाने निर्णय दिल्याने राज्य सरकारने नवीन आयोग निर्माण केला आहे. विशेष राज्य मागासवर्ग आयोग न नेमता राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचे काम सोपवले पाहिजे. यासाठी मराठा समाजाचा स, आर्थिक स्थिती याची माहिती गोळा करण्याचे काम दिले पाहिजे, असेही मेटे यांनी म्हंटले.



RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -