रशिया-युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदार सोमवारी पुन्हा सुरक्षित आश्रयाला परतत सोन्यावर सट्टा लावत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत
आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर, सकाळी सोन्याची फ्युचर्स किंमत 1.5% वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्यात 800 रुपयांनी जोरदार वाढ झाली. त्याचप्रमाणे, चांदीची फ्युचर्स किंमत देखील 1,000 रुपये किंवा सुमारे 1.5 टक्क्यांनी वाढून 65,869 किलोवर पोहोचली. जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रशियावरील निर्बधांमुळे जागतिक बाजारालाही धक्का बसला युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 1 टक्क्यांनी वाढून $1,909.89 प्रति औंस झाला. चांदीचा भावही 1 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 26 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.