Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररोमानियाहून भारतीय विद्यार्थी मायदेशी, नारायण राणेंकडून मातृभूमीत स्वागत

रोमानियाहून भारतीय विद्यार्थी मायदेशी, नारायण राणेंकडून मातृभूमीत स्वागत

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक मायदेशी परत येत आहेत. मिशन गंगा अंतर्गत अनेक भारतीयांना मातृभूमीला परत आणले जात आहे.
रोमानियाची राजधानी बुचारेस्टहून विद्यार्थ्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. मिशन गंगा अंतर्गत तब्बल 182 विद्यार्थी मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

रोमानियाहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. परतलेल्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राणेंनी विमानतळावर हजेरी लावली.
नारायण राणे यांनी विमानात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मंगळवारी सकाळी 7.20 वाजता विद्यार्थ्यांचे फ्लाईट मुंबईत दाखल झाले

महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 24 जणांचा समावेश आहे. मायभूमीवर परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता.

रोमानियामार्गे परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 24, केरळच्या 26, गुजरातच्या 50, कर्नाटकच्या 11, राजस्थानच्या 8, तेलंगणाच्या 16, हरियाणाच्या 9, पश्चिम बंगालच्या 01, तर दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड, चंदिगड येथील सुमारे 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -