राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्ब स्फोट घडवणाऱ्यां कडून तुम्ही जमीन खरेदी करता, यामुळे दाऊदचा खरा फंट मँन नवाब मलिक असू शकतो, असा आरोप राणे यांनी केला आहे.
निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवाद काँग्रेससाठी हा किती गंभीर विषय आहे हे आम्ही पाहिले. मात्र, मलिक यांच्यावर झालेल्या आरोपानुसार मलिक यांनी दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात जमीन खेरदी केली. त्यातही ब्लॅक मनीचा वापर झाल्यामुळे याचा ट्रेंड ईडीकडून घेतला जात आहे.
राष्ट्रवादी पक्षातील नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गंभीर विषयावर शरद पवार हे बोलत नाहीत. मात्र, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावतात. आणि त्याच्याकडे विचारपूस करतात. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे. मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.