Monday, December 23, 2024
Homeआरोग्यउपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर 'या' 4 चूका असू...

उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

Fasting Cause Weight Gain |

अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये उपवास (Fasting) करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की उपवास केल्याने शरीर आतून डिटॉक्स (Detox) होते आणि शरीरातील अनावश्यक चरबी (Body Fat) देखील कमी होते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांचे उपवास केल्यावर वजन कमी होण्याऐवजी वाढते

अशावेळी वजन कमी करण्याच्या संकल्पावर परिणाम होतो. जर उपवासात दिवसभर अनहेल्दी फूड (Unhealthy Food) खात असाल तर त्याचा परिणाम शरीरासाठी हानिकारक आहे. बाहेर असताना काही लोक भूक भागवण्यासाठी डबाबंद फराळ किंवा तळलेले, भाजलेले पदार्थ खाऊन पोट भरण्याची चूक करतात. त्यामुळे वजन वाढू लागते उपवासात या चुका करू नका.

1. गोडापासून दूर रहा अनेकजण उपवासात गोड खाणे पसंत करतात. गोड खाल्ल्याने त्यांना ऊर्जा मिळते. पण यामुळे वजन वाढू लागते. साखर कमी केली तर वजन नियंत्रणात राहील.

2. तळलेले पदार्थ खाणे (Fry Food) लोकांना उपवासात बटाटा फ्राय, बटाटा चिप्स खायला आवडतात. पण यामुळे वजन वाढते. यासाठी बटाटा भाजून सेवन करा. बेक केल्याने बटाट्यातील फॅट (Potato Fat) निघून जाते आणि तो जास्त हेल्दी, चवदार होतो.

3. सतत जेवणावर लक्ष (Stop Thinking About Food) जर तुम्ही सतत जेवणाचा विचार करत राहिलात आणि काय खावे आणि काय खाऊ नये याचा विचार करत राहिल्यास तुमची लालसा वाढेल. यामुळे गोड खाण्याची इच्छा होईल. उपवास करण्यापूर्वी काय खावे हे ठरवण्याचा प्रयत्न करा. सकस आहार, फळे, सुका मेवा इत्यादींचा आहारात समावेश करणे चांगले.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -