ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनात 105 टक्के लोकं भीतीनेच मेली. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहे, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा आणखी एक संघर्ष उभा राहण्याचे संकेत आहेत. या वक्तव्यामुळे डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाकरिता मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे अमरावतीत आले होते. महापालिकेने ठराव घेतल्यानुसार राजापेठ उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. राजापेठ उड्डाणपूलाचे नामकरण करण्याकरिता अमरावतीत आले असता, त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
बोलता-बोलता ते चांगलेच संतापले. एका कार्यकर्त्याला खडसावत ते म्हणाले, ‘ये कोरोना तोंडाच काढ मुचक तु गांडू नाहीयेस.. तोंडाला मुचके बांधणे **पणाचे लक्षण आहे.’ डॉक्टर काय ते सांगू दे.. ते लोकांना लूटतात अश्या डॉक्टरांना धरून हाणले पाहिजे. कोरोना हे थोतांड आहे. काहीही झाले तरी त्यांच्याकडे जाऊ नका असे भिडे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात चांगलेच पडसाद उमटत आहेत. संपूर्ण जग कोरोनासोबत चार हात करीत असताना डॉक्टरांबाबत असे वादग्रस्त व्यक्तव्य निषेर्धाह असल्याचे डॉक्टर संघटनांचे म्हणणे आहे.