ताजी बातमी ऑनलाइन टीम
महाराष्ट्रात विद्युत निर्मिती साठी लागणाऱ्या कोळशाची उन्हाळ्याच्या टंचाई निर्माण झाली असून विद्युत निर्मिती करणाऱ्या महाजेनको कडे आता केवळ दोनच दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पुढे आता काळोख दाटला असून उन्हाळ्याच्या तोंडावर भारनियमनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्युत निर्माण करणारी महाजनको कंपनी कोल इंडियाचे तब्बल 20 ते 22 हजार कोटी रुपये देणे आहे. त्याचबरोबर महावितरणची ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण सध्या अडचणीत आहे. परिणामी राज्याला आता अंधाराला सामोरे जावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.