Friday, November 22, 2024
Homeराजकीय घडामोडीविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (3 मार्च) सुरू होत आहे. यापूर्वी झालेले हिवाळी अधिवेशन कोविड विषाणूच्या  प्रादुर्भावामुळे केवळ आठ दिवसांचेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे यावेळी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढवलाय. हे अधिवेशन 3 मार्च ते 25 मार्च असे एकूण 22 दिवस असेल. दरम्यान 11 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तर प्रलंबीत बिल आणि मागण्या यावर पाच दिवस चर्चा होईल. गेली दोन वर्ष कोरोनामुळं अधिवेशन कालावधी कमी होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अधवेशनाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळं हे अधिवेशनही लक्षवेधी आणि वादळी ठरणार हे निश्चित आहे.

दरवर्षी नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन राज्यसरकारनं कोरोनाचं निमित्त पुढं करून मुंबईत घेतलं होतं. यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील अधिवेशन नागपूरमध्ये घेऊ असे सांगितले होते. मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील मुंबईतच घेण्याचे ठरले आहे. संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी सांगितले की,

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा सरकारचा मानस होता.परंतु, विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या माहिनुसार नागपूरमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृह उपलब्ध नाही. शिवाय तेथील आमदार निवास देखील क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशन घेणं शक्य नाही असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -