Friday, November 22, 2024
HomeबिजनेसStock Market : सेन्सेक्स 600 अंकांवर तर निफ्टी 16,600 वर सुरु

Stock Market : सेन्सेक्स 600 अंकांवर तर निफ्टी 16,600 वर सुरु

भारतीय शेअर बाजाराने बुधवारी पुन्हा एकदा कमकुवतपणाने सुरुवात केली. सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठ्या घसरणीसह ट्रेडींगला सुरुवात केली.
जागतिक घटकाच्या दबावाखाली गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्री सुरू केली आणि बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी खाली आला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 618 अंकांनी घसरून 55,629.30 वर तर निफ्टी 21 अंकांच्या घसरणीसह 16,593.10 वर उघडला. सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 613 अंकांच्या घसरणीसह 55,700 च्या जवळ ट्रेड करत होता. निफ्टीही 144 अंकांनी घसरून 16,650 वर ट्रेड करत होता.

‘या’ शेअर्स वर गुंतवणूकदारांची नजर आहे जर आपण क्षेत्रानुसार पाहिले तर आज बाजारात संमिश्र कल दिसत आहे. बँक आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होत असतानाच आज धातूचे शेअर्स कडाडले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशियायुक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार मेटल क्षेत्रातील शेअर्सवर सट्टा लावत आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र आशियाई बाजारांची सुरुवातही कमकुवतपणाने झाली बुधवारी आशियातील प्रमुख शेअर बाजारात घसरणीसह ट्रेडींगला सुरुवात झाली. सिंगापूरच्या एक्सचेंजमध्ये 0.78 टक्के आणि जपानमध्ये 1.33 टक्के घसरण झाली. तैवानमधील ट्रेडिंगही 0.32 टक्क्यांच्या तोट्याने सुरू झाले. केवळ दक्षिण कोरियाच्या बाजारात 0.06 टक्क्यांची वाढ दिसून आली. युरोपीय बाजारही एका दिवसापूर्वी सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीने बंद झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -