राज्य सरकारने आज अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर केलीय. यावेळी लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र राज्य सरकारने ही सक्ती मागे घेण्यास कोर्टात नकार दिला आहे. त्यामुळे लोकस प्रवासासाठी पूर्वीप्रमाणेच लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे. गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे घरात बसून राहवं लागलं आहे. आपले अनेक दिवस कोणत्या ना कोणत्या निर्बंधात गेले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेवेळी राबवलेल्या कडक नियमावलीमुळे आता कुठे तिसरी लाट कमी होताना दिसतेय. त्यामुळे निर्बंध शिथिल होत आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -