अक्षय कुमार स्टार बच्चन पांडे या चित्रपटातील मेरी जान हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात इमोशन आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. ‘बच्चन भैय्या यांचे हृदय आणि डोळे दगडाचे असले तरी आजही त्यांच्या मनात लोकांबद्दल भावना आहे’ असा डायलॉग व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकायला मिळतो. ‘मेरी जान’ चित्रपटातील हे दुसरं गाणं बी प्राकने गायलं असून त्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. हे गाणं मनाला स्पर्शून जातं. यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
अक्षयने या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारली असून यात क्रिती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका गँगस्टरवर आधारित आहे ज्याला अभिनेता बनायचे आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी होळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता परंतु नंतर कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.
अक्षय कुमारबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी त्याचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र अक्षयच्या या सिनेमाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत. या चित्रपटात कृती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह प्रतिभावान कलाकारांची टीम देखील दिसणार आहे.