जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स सेव्हिंग ऑप्शनच्या शोधात असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे पैसे वाचवू शकणारे पर्याय गमावणे कोणालाही आवडत नाही. वेगवेगळी लोकं हे करण्याचे वेगवेगळे मार्ग पसंत करतात.
नागरिकांमध्ये जास्त टॅक्स वाचवण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कलम 80c अंतर्गत काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या अंतर्गत, तुम्ही विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये पैसे गुंतवून टॅक्स सूट मिळवू शकता.
पगार भत्ता
तुमचे कर दायित्व कमी करण्यासाठी बहुतेक कंपन्या तुमच्या पगारात विविध तरतुदी करतात. या संदर्भात तुम्ही तुमच्या कंपनीच्या HR शी बोलू शकता. तुम्ही तुमच्या पगाराचा भाग म्हणून वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता आणि टेलिफोन खर्च यासारखे भत्ते घेऊ शकता, कारण ते करपात्र नाहीत.
घरभाडे भत्ता
घरभाडे भत्ता (HRA) कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात सामान्यतः घरभाडे भत्ता (HRA) मिळतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि नियोक्त्याकडून भाडे भत्ता मिळत असेल, तर तुम्ही, एक कर्मचारी म्हणून, आयकर कायद्यानुसार HRA वर सूट मिळण्याचा क्लेम करू शकता.
धर्मादाय योगदान
तसेच, कलम 80G अंतर्गत धर्मादाय योगदान तुमच्या उत्पन्नाच्या 10% पर्यंत वजा केले जाते. मात्र, तुम्ही पावतीशिवाय देणगी देण्याऐवजी संस्थेकडून पावती आणि त्यांच्या आयकर सूट प्रमाणपत्राची प्रत मिळाल्याची खात्री करा.