Friday, July 25, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात

कोल्हापूर : १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर मध्ये आज पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा रचून सापडला . महावितरणचा सहायक अभियंता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे या अभियंत्याचे नांव आहे. ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.



तक्रारदार यांनी महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी ते संशयित धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी त्याने त्यांच्याकडे लाचेची मागणी केली हाेती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -