उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या पीएशी ओळख असल्याचं खोटं सांगून गंडा घालण्यात आला. पुण्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणाची दहा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. पुणे महापालिकेमध्ये कामाचं कंत्राट मिळवून देतो, असं सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्या बरोबर ओळख आहे, असं खोटं सांगून 10 लाखाची फसवणूक करण्यात आली. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. अजित पवार यांच्या नावाचा दुसऱ्यांदा गैरवापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएशी आपली ओळख आहे, असल्याचं खोटं सांगून पुण्यात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणाला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.
पुणे महापालिकेमध्ये कामाचं कंत्राट मिळवून देतो, असं सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी माझी ओळख आहे, असं भासवून आरोपीने पीडित तरुणाकडून 10 लाख रुपये उकळल्याची माहिती आहे.
अजितदादांच्या नावे दुसऱ्यांदा फसवणूक
पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. अजित पवार यांच्या नावाचा दुसऱ्यांदा गैरवापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.