Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगपुढील आठवड्यात पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?

पुढील आठवड्यात पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम


देशात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात कोणतीही भाववाढ करण्यात आलेली नाही. मात्र पुढील आठवड्यात इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्चे तेल (crude oil) प्रति डॉलर 100 रुपयांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज आठवड्याभरापूर्वीच लावण्यात आला होता. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी आणि किती वाढणार याबाबत निश्चित माहिती नव्हती. तज्ज्ञांच्या मते पुढील आठवड्यात पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात हळहळू दरवाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. मात्र कच्चे तेल महाग होऊन देखील भारतात इंधनाच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. याचा मोठा फटका हा इंधन कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पुढील आठवड्यात पेट्रोल नऊ रुपयांनी महाग होण्याचा अंदाज आहे.



निवडणुकांच्या निकालानंतर भाववाढ
ब्रोकरेज कंपनी जे. पी. मॉर्गन या कंपनीच्या रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आहे. या निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले जाऊ शकतात. उत्तरप्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या सात मार्चला आहे. त्यानंतर पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या दहा मार्चला जाहीर होणार आहेत. एकिकडे आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देखील भारतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये येणाऱ्या काळात मोठी वाढ पहायला मिळू शकते.

110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले कच्चे तेल
गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा बाजारपेठेवर होताना दिसत आहे. महागाईचा भडका उडाला आहे. धातूसह सर्वच गोष्टी महागल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मागील काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास चार टक्क्यांची वाढ झाली असून, कच्चे तेल 110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. युद्ध सुरूच राहिल्यास येत्या काळात सर्वच वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -