कुख्यात गँगस्टर अंकित गुर्जर याच्या तिहार तुरुंगातील संशयास्पद मृत्यूचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी याबाबतचा आदेश दिला. तुरुंग अधिकार्यांनी अंकितची हत्या केली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता तर कैद्यांदरम्यानच्या हाणामारीत अंकितचा मृत्यू झाल्याचा दावा तुरुंग प्रशासनाकडून करण्यात आला होता.
दिल्ली पोलिसांकडून केल्या जात असलेल्या तपासावर आपण समाधानी नाही, असा शेरा मारत न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता अंकितच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला. अंकित गुर्जरचा मृत्यू संशयास्पद आहे.
तुरुंगातील अधिकार्यांवरही गंभीर आरोप झालेले आहेत. अशा स्थितीत या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले.
तिहार तुरुंगाचे उपअधिक्षक नरेंद्र मीना तसेच अन्य तीन अधिकार्यांना खंडणीच्या स्वरुपात काही रक्कम देण्यास अंकितने नकार दिला होता.
त्यामुळे तुरुंग अधिकार्यांनी बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबियांनी गेल्या आठवड्यात केला होता. आरोप झालेल्या अधिकार्यांना याआधीच तिहार तुरुंग प्रशासनाने निलंबित केलेले आहे.
कुख्यात गँगस्टर अंकित गुर्जर मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -