बॉलिवूडची गंगुबाई आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफसवर चांगलाच गल्ला जमावायला सुरुवात केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे पाचव्या दिवशी देखील ‘गंगुबाई’चा जलवा कायम होता. चित्रपटाने महाशिवरात्रीच्या दिवशी 50 कोटींचा आकडा पार केला. गंगुबाई काठियावाडीच्या निमित्ताने आलिया भट्ट सध्या बॉक्स ऑफिसवर राज करत असून हा चित्रपट मोठी कमाई करेल यात शंका नाही. गंगुबाई काठियावाडीने पहिल्याच दिवशी म्हणजे 10.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारी 39.12 कोटी रुपये कमाई केली. त्यानंतर सोमवारी चित्रपटाने 8.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली. पाचव्या दिवशी देखील चित्रपटाची घोडदौड सुरूच होती. पाचव्या दिवशी ‘गंगुबाई’ने 9 ते 9.5 कोटींची कमाई केली. यामुळे चित्रपटाने 55 कोटींचा आकडा पार केला. असेच कलेक्शन सुरु राहिले तर 175 ते 180 कोटींच्या घरात चित्रपट कमाई करेल असा अंदाज आहे. चित्रपट सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिकमधून जवळपास 110 कोटींची कमाई अपेक्षित आहे. थिएटरमधून जवळपास 65 कोटींची कमाई होऊ शकते असा अंदाज आहे. या चित्रपटात आलिया भट्टने गंगुबाई काठियावाड हे पात्र साकारलं आहे.
‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटात करीम लाला हा गंगुबाई हिला आपली बहीण मानतो. गंगुबाईला जेव्हा कोणीही मदत करत नाही तेव्हा करीम लाला तिच्या मदतीसाठी पुढे येतो. ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन जैदी यांच्या म्हणण्यानुसार गंगुबाई ही गुजरत येथील काठियावाड येथील रहिवासी होती. त्यामुळे तिला गंगुबाई काठियावाडी म्हटलं जात होतं. तिला तिच्या पतीने 500 रुपयात विकलं होतं. आयुष्यात आलेले आव्हान स्विकारता गंगुबाई परिस्थितीचा सामना करत कशी लढते यावर चित्रपटाची कधा आधारित आहेत.