Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानSamsung यूजर्ससाठी वाईट बातमी! यापुढे मिळणार नाही गॅलेक्सी नोट ब्रँड

Samsung यूजर्ससाठी वाईट बातमी! यापुढे मिळणार नाही गॅलेक्सी नोट ब्रँड

सॅमसंग यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने लोकप्रिय ब्रँड गॅलेक्सी नोट ब्रँड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द वर्ज’ च्या रिपोर्टनुसार सॅमसंगने गॅलेक्सी एस 22 अल्ट्राचा उल्लेख करत हा ब्रॅंड बंद केला आहे. सॅमसंग स्मार्टफोन प्रमुख रोह ताएमून यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

याआधी देखील सॅमसंगने 2020 मध्ये गॅलेक्सी नोट 20 आणि नोट 20 अल्ट्रा रिलीज झाल्यापासून गॅलेक्सी नोट डिव्हाइस रिलीज केलेले नाही. एक दशकापूर्वी (ऑक्टोंबर 2011) सॅमसंगने जेव्हा पहिल्यांदा गॅलेक्सी नोट बाजारात आणला होता. तेव्हा सॅमसंगने बाजारात वर्चस्व निर्माण केले होते. ग्राहकांच्या पसंतीस हे स्मार्टफोन उतरले होते. रिपोर्टनुसार, स्मार्टफोनला लोकप्रिय बनविण्यासाठी नोट महत्त्वपूर्ण होते. मात्र आता हा ब्रँड बंद करण्यात आला आहे.

सॅमसंगने 17 फेब्रुवारी रोजी भारतात गॅलेक्सी एस 22 सीरिज लाँच केली आहे. भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस 22 स्मार्टफोन 8 GB रॅम प्लस 256 GB स्टोरेजसह बाजारात आणला असून किंमत 72,999 रुपये ठेवली आहे. तर गॅलेक्सी एस 22 प्लस 8GB प्लस 128 GB मॉडेलची किंमत 84,999 पासून सुरु होईल. तर 8 GB प्लस 256 जीबी मॉडेलची 88,999 रुपये किंमत आहे. यासह गॅलेक्सी एस 22 अल्ट्रा 12 जीबी प्लस 256 GB पर्यायायासह या मॉडलची किंमत 1,09,999 रुपये आहे.

दरम्यान, टॉप-ऑफ-लाईन 12 GB प्लस 512 जीबी मॉडेलची किंमत 1,18,999 रुपये आहे. टॉप-ऑफ-लाईन 12 GB प्लस 512 जीबी मॉडेलमध्ये snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिले आहे. या स्मार्टफोमध्ये 6.8 QHD + Dynamic AMOLED 2X पॅनल दिले असून, याचा रिफ्रेश रेट 240 हर्ट्ज आहे. यासह एस-पेनसाठी डेडिकेटेड पॉकेट देखील दिले आहे. यामध्ये 108 मेगापिक्सल वाइड कॅमेरा दिला आहे. सोबतच 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचे दोन टेलीफोटो लेन्स मिळतात. फ्रंटला 40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर पॉवरसाठी 5000 एमएएच बॅटरी आहे. दरम्यान, नवीन सीरिजमुळे सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी नोट ब्रँड बंद केला आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे नोट ब्रँडचे डिव्हाईस खरेदी करता येणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -