Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरसरसेनापती धनाजी जाधव यांच्या समाधी स्थाळास शिवपुत्र ग्रुप यांची भेट:-

सरसेनापती धनाजी जाधव यांच्या समाधी स्थाळास शिवपुत्र ग्रुप यांची भेट:-

मिरज / प्रतिनिधी
धनाजी जाधव (जन्म : इ.स. १६५०; – २७ जून १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला.सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी स्मारक – कोल्हापूर जिल्ह्यामधील पेठ वडगांव (तालुका हातकणगले) येथे आहे.

सरसेनापती धनाजी जाधव यांनी स्वराज्य साठी प्राण आहुती दिली.तसेच त्यांची पत्नी या सती गेल्या गाेपीकाबाई जाधव या पवित्र भुमीस आज वंदन केले.यावेळी ज्ञानदेव चव्हाण चे वंशज पुजारी आहेत.त्यांच्या हास्ते पुष्पहार अर्पण केला. शिवरायांच्या नंतर त्यांनी स्वराज्य काेसळे त्यांनी स्वराज्य सावरुन धरले.माेगलाना सळो कि पळाे करून साेडले  माेगलांच्या घाेड्यास पिण्याच्या पाण्यात दिसू लागले.जुलि्फकारखान, ईस्मालखान, या सारख्या नामांकित माेगल सपाटून पराभव केला.गुजरात पासून तंजावर पर्यंत त्यांनाी शेकडो लड़ाई करून स्वराज्य संभाळले.त्याच्या समाधीस आज शिवपुत्र ग्रुपने भेट देऊन अभिवादन केले.यावेळी सदानंद जंगम, स्वप्निजीत पाटील,तानाजी पाटील,दत्तात्रय यादव,सागर वाघमारे,(मनपाडळेकर)उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -