मिरज/प्रतिनिधी
भाजपाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून येत्या दोन एप्रिल रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर शिराळ्यातील कार्यक्रमात त्यांचा रीतसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. आज आज बुधवारी 2 मार्च रोजी माजी मंत्री नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन येथे भेट घेतली. त्या वेळी खा. पवार यांचेबरोबर झालेल्या चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.माजी मंत्री नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन येथे भेट घेतली.गेल्या महिनाभरापासून नाईक यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा प्रवेश या चर्चेवर आता पडदा पडला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत खासदार पवार म्हणाले की शिवाजीराव तुम्ही पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे च होता आता पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश करत आहात. पूर्वी तुम्ही राष्ट्रवादीचे होता यापुढे तुम्ही सर्वांबरोबर मिळून मिसळून काम करा व पक्ष वाढवा असे आवाहन त्यांनी केले. आज माजी मंत्री नाईक यानी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याशी देखील चर्चा केली आहे त्यांच्यासमवेत शिराळा चे आमदार मानसिंगराव नाईक यशवंत उद्योगसमूहाचे चेअरमन रणधीर नाईक यशवंत दूध संघाचे सत्यजित नाईक शिवाजी केनचे अभिजीत नाईक आदी उपस्थित होते.
सांगलीत माजी मंत्री महोदयांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम यशस्वी:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -