Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War  : कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार

Russia Ukraine War  : कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार

रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज नववा दिवस आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र रशिया युद्ध थांबवत नसल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेनंतर आता ब्रिटनने देखील रशियावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनकडून रशियन उद्योगपतींना व्हिसा नाकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे फ्रान्स ने देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी  रशियामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कीवमधून पोलंडच्या बॉर्डवर येत असताना या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -