Sunday, December 22, 2024
Homeनोकरीरिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी

रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरबीआयने या भरतीअंतर्गत सहाय्यक पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार हे लक्षात ठेवा की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2022 आहे. तोपर्यंत उमेदवार ऑनलाइन  पद्धतीने आपला अर्ज दाखल करू शकतात. कृपया हेही लक्षात घ्या की पदवी उत्तीर्ण उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या भरती प्रक्रयेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचा पाहण्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. या भरतीअंतर्गत भरल्या जाणाऱ्या सहाय्यक पदांसाठी उमेदवारंची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि LPT परीक्षेच्या आधारे केली जाईल. तसेच पदांवर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना किती पगार मिळेल याबद्दल अधिक माहिती अधिकृत अधिसूचनेद्वारे मिळू शकते. RBI सहाय्यक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 20,700 रुपये वेतन दिले जाईल.

याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना 265 रुपये अतिरिक्त पगार, 2200 रुपये ग्रेड भत्ता, 12,587 महागाई भत्ता, 2238 घरभाडे, 2040 विशेष भत्ता आणि 1793 रुपये स्थानिक नुकसान भरपाई भत्ता दिला जाईल. यानुसार निवडलेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 40,000 रुपये पगार दिला जाईल. त्यामुळे या भरती परीक्षेत सहभागी होण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी 8 मार्च ही शेवटची तारीख आहे.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -