कोंत्येबोबलाद (ता. जत) येथील शिवाजी भिवा करे (वय 32), मारुती लिंबाजी सरगर (वय 32), पांडुरंग शंकर लोखंडे (वय 36) आणि श्रीशैल सैदाप्पा कांबळे (वय 46) या चौघांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयित लोखंडे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. याबाबतचे दोषारोषपत्र पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांनी न्यायालयात दाखल केले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कोंत्येबोबलाद येथील जगताप नामक एका व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी आर्थिक वादातून कर्नाटकात नेवून संशयितांनी मारहाण केली होती. या प्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यानुसार तपास सुरू होता. संशयित शिवाजी करे, मारुती सरगर, पांडुरंग लोखंडे, श्रीशैल कांबळे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडे, मारामारी, चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे यासारखे संघटित प्रकारचे गुन्हे दाखल होते. महासंचालकांनी मोका लावण्यास मंजुरी दिली आहे.