Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवणार

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत .त्यांच्या हस्ते मेट्रो प्रकलपाचे उदघाटन केले जाणार आहे. तसेच महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाही अनावरण सोहळा पार पडणार आहे. मात्र पंतप्रधानांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्ष विरोध करणार आहे. मूक आंदोलन करत मोदींना करणार विरोध करणार आहे. सकाळी 10 ते 12 दोन तास आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. या आधी मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा राष्ट्रवादीने इशारा दिला होता. नरेंद्र मोदी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पुण्यात येत आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झालेले असताना पंतप्रधानांना बोलवून शहर भाजपा त्यांची दिशाभूल करून पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

भाजपकडून दिशाभूल एकीकडे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अर्धवट विकासकामांच्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्यांचा निषेध काळे झेंडे न दाखवता मूक आंदोलनाने करण्यात येणार आहे.’ राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधानांच्या निषेधार्थ काही व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत. पालकमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित राहणार असले तरी राष्ट्रवादीतर्फे मूक आंदोलन केले जाणार आहे.  मेट्रोचे 31किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान उदघाटनासाठी आले असते, तर आम्हाला आनंदच झाला असता. 5  किमीच्या मार्गाच्या उदघाटनासाठी येणे म्हणजे शहरातील फुलराणीच्या उदघाटनसाठी येण्यासारखे आहे आणि हे पहावे लागणे हे आपले दुर्दैव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -