Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानआता इंटरनेटशिवाय व्‍हाॅट्‍स ॲप वापरा; जाणून घ्या सविस्तर

आता इंटरनेटशिवाय व्‍हाॅट्‍स ॲप वापरा; जाणून घ्या सविस्तर

सोशल मीडियामध्‍ये व्‍हाॅट्‍स ॲपला  युझर्सची सर्वाधिक पसंती  पाहायला मिळते. हे ॲप नेहमीच युजरसाठी वेगवेगळे फिचर आणत असते. संवादामध्‍ये आणखी सुलभता आणण्‍यासाठी व्‍हाॅट्‍स ॲपने आणखी एक फिचर आणले आहे.

MBBSला प्रवेश घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 520 जागा वाढल्या

व्‍हाॅट्‍स ॲपने मागील काही महिने  एका फिचरचे टेस्टींग सुरु केले होते. संबंधित फिचरला अनुसरून व्‍हाॅट्‍स ॲपने सांगितले होते की, “डेस्कटॉप युझर्स ( व्‍हाॅट्‍स ॲप वेब ॲक्‍सेस घेणारे) मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही  मेसेज, फोटो शेअर करु शकता. तुम्हाला इतर कोणी मेसेज केला तर माेबाईल इंटरनेट सुरु नसतानाही मेसेज तुम्हाला डेस्कटॉप हाॅट्‍स ॲपवर मिळणार आहे.  थोडक्यात सांगायचे तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला व्‍हाॅट्‍सॲप वापर करत असताना तुमच्या मोबाईलला इंटरनेटची गरज भासणार नाही.

सुमारे ८ महिन्यांच्या टेस्टिंगनंतर व्‍हाॅट्‍स ॲपने हे नवीन फिचर बीटा युजर्सना उपलब्ध करून दिले आहे. व्‍हाॅट्‍स ॲप डेस्कटॉपचे युजर्स आपला मोबाईल फ्लाईट मोड (Flite Mode) वर ठेवूनही आता या फिचरमुळे हाॅट्‍स ॲपचा वापर करु शकतील.

प्रथमत: आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की, व्‍हाॅट्‍सॲपचे नवे फिचर फक्त डेस्कटॉप युजर्सना आहे. तुम्ही डेस्कटॉपवर व्‍हाॅट्‍स ॲप वापरत असाल तर हे नवे फिचर तुमच्यासाठी खूपच महत्त्‍वाचे आहे. पाहूया हे नवे फिचर आपल्या मोबाईलला कसे ॲक्टीव्ह करायचे.
1. प्रथमत: तुम्ही तुमचे व्‍हाॅट्‍सॲप अपडेट करावा.
2.व्‍हाॅट्‍सॲपचे हे नवे फिचर अपडेट करण्यासाठी व्‍हाॅट्‍स ॲपच्या सेटिंगमध्ये जा.
3. लिंक्ड डिवाईस  हा ऑप्शन निवडा त्यानंतर तुम्हाला मल्टी डिवाईस बीटा हा ऑप्शन दिसेल.
4. मल्टी डिवाईस बीटा या ऑप्शनवर क्लिक करून बीटा व्हर्जन जॉईन करा. त्यानंतर तुमची या नव्या फिचरची सेटिंग पूर्ण झाले असेल.
5.त्यानंतर तुम्ही तुमचे व्‍हाॅट्‍सॲप डेस्कटॉपला स्कॅन करा. त्यानंतर तुमचे इंटरनेट बंद करा. आता तुमचे व्‍हाॅट्‍सॲप डेस्कटॉपचे इंटरनेट वापरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -