Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर :  राजारामपुरीतील एकाला खूनप्रकरणी मरेपर्यंत कारावास, जिल्हा कोर्टाचा निकाल

कोल्हापूर :  राजारामपुरीतील एकाला खूनप्रकरणी मरेपर्यंत कारावास, जिल्हा कोर्टाचा निकाल

कोल्हापुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी राजारामपुरीतील प्रसन्न ऊर्फ बाळू सज्जन साठे (वय ५०, रा. पाचवी गल्ली, राजारामपुरी) याला शनिवारी न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

राज्यावर पुन्हा पावसाचे सावट! या जिल्ह्यांमध्ये या तारखेला कोसळणार सरी

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी खटल्याचा निकाल दिला. आरोपी प्रसन्ना उर्फ बाळू साठे आणि त्यांची भावजय यांच्यात कौटुंबिक कारणातून २१ एप्रिल २०१८ मध्ये वादावादी सुरू होती. आरोपीने भावजयीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता.

दीर, भावजय यांच्यातील वादात संदीप बेरड (रा. पाचवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपीने आमच्या भांडणात भाग घ्यायचा तुझा काय संबंध, असा सवाल करीत अचानकपणे त्याच्यावर शस्त्राने वार केला. पोटावर, छातीवर झालेल्या हल्ल्यात संदीप बेरड याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध राजाराम पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील शहाजी निकम यांनी आरोपीला बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश शेळके यांच्या कोर्टात सुरू होती. सरकारतर्फे सरकारी वकील ए. ए. महाडेश्वर यांनी कामकाज चालवले न्यायालयाने साठे याला दोषी ठरविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -