बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रा ही जोडी अनेकांना आवडते. त्यांची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीला उतरते. या जोडीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.’रुला देती है’ हे गाणं नुकतंच रिलीज झालंय. करण-तेजस्वी हे गाणे रिलीज होताच व्हायरल झालं आहे. यासर देसाईने हे गाणं गायलं आहे. तर देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनेलवरून हे गाणे रिलीज झालं आहे. करण आणि तेजस्वी या दोघांनीही हे गाणं इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
दिल की बात’ म्हणत करणने हे गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. तसंच ‘रुला देती है माझ्यासाठी नेहमीच खूप खास गाणं असेल. माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ… तुम्ही हे गाणं मनापासून पाहावं, असं मला वाटतं. आम्ही सर्व तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद”, असं करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
तेजस्वीनेही आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि रील्स तयार करून शेअर करा, असं तिनं म्हटलंय.
‘रुला देती है’ हा करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा बिग बॉस सीझन 15 नंतरचा पहिला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ते एकत्र दिसत आहेत. बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता या गाण्याच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.