Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रनातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

बाईक अपघातात पिता पुत्राचा मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जाताना हा अपघात झाला. धुळ्यातील भडणे फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. लहान मुलाला सोबत घेऊन पिता मोटरसायकलने जात होता. यावेळी अज्ञात वाहनासोबत त्यांच्या बाईकची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार पित्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात बाईकस्वाराचे धड आणि शिर वेगळे झाले. तर गंभीर जखमी झालेल्या लहान मुलाने उपचारादरम्यान प्राण सोडले. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावातील विनोद राजपूत हे सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी सुरत येथून आपल्या गावी आले होते नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी विनोद राजपूत हे त्यांचा लहान मुलगा कृष्णासोबत मोटरसायकलने जात होते.

यावेळी भडणे फाट्याजवळ भडगाव भागात अज्ञात वाहनासोबत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मुलगा कृष्णाला रुग्णालयात दाखल केले. तिथून धुळ्याला घेऊन जात असताना मुलाचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की विनोद राजपूत यांचे मुंडके आणि धड वेगवेगळे झाले. राजपूत यांच्या बाईकला धडक देणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -