Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनएस एस राजामौली 'बाहुबली 3'च्या तयारीत? अभिनेता प्रभासने दिली ही माहिती

एस एस राजामौली ‘बाहुबली 3’च्या तयारीत? अभिनेता प्रभासने दिली ही माहिती

ताजी बातमी ऑनलाइन टीम
बाहुबली 3′ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S.S. Rajamouli) आण प्रभास (Prabhas) पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रभासने नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत तो पुन्हा एकदा एस एस राजामौलींसोबत काम करू शकतो असे वक्तव्य (Prabhas fresh comments on Baahubali 3) केले आहे. प्रभासच्या या वक्तव्यामुळे ‘बाहुबली 3’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे.



दरम्यान, एस. एस. राजामौली (S.S. Rajamouli) सध्या त्याच्या आरआरआर (RRR) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. हा चित्रपट 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे बाहुबलीचा स्टार अभिनेता प्रभास देखील त्याच्या ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात प्रभास अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) स्क्रीन शेअर करणार आहे. प्रभासचा हा सिनेमा 11 मार्चला सिल्व्हर स्क्रीनवर दाखल होणार आहे.

प्रभास आणि एस एस राजामौली यांचं नाव सोबत आलं तर ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ चित्रपटातील प्रत्येक क्षण आठवतो. दक्षिणेतील सर्वात आयकॉनिक आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये बाहुबली सीरीजचा समावेश होतो. दरम्यान ही जोडी पुन्हा एकदा सोबत येणार असल्याच्या चर्चेमुळे बहुबलीच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -