पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास शाही फेटा बनवण्यात आला आहे. दरम्यान, भेट देण्यात येणाऱ्या फेट्यावरील राजमुद्रा काढण्यात आली आहे. मुरूडकर झेंडेवाले यांनी हा खास फेटा मोदी यांच्यासाठी बनवला आहे. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सांगण्यावरून फेट्यावर खास राजमुद्रा लावण्यात आली होती. मात्र, ही राजमुद्रा आता हटविण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या राजमुद्रेवरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी या फेट्यावरून राजमुद्रा हटवून त्यावर सूर्यफूल लावण्यात आले आहे. यावरून कुठलेलेही राजकारण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे मुरुडकर फेटेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातली मेट्रो प्रकल्प उद्घाटन, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुण्यातील खंडोजी बाबा चौक म्हणजेच डेक्कन कॉर्नर ते शिवतीर्थ नगर दरम्यान चा रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूनी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी 2 वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.