Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानलग्नाच्या वऱ्हाडींसाठी आता बुक करता येणार ट्रेन; जाणून घ्या कशी कराल बुकिंग!

लग्नाच्या वऱ्हाडींसाठी आता बुक करता येणार ट्रेन; जाणून घ्या कशी कराल बुकिंग!

लग्न समारंभ म्हटलं म्हणजे आनंदाचा क्षण असतो. यासाठी वधू-वर पक्षांकडील परिवाराला अनेक प्रकारच्या तयारी कराव्या लागतात. यात वऱ्हाड जर बाहेरगावी घेऊन जायचे म्हटल्यास राज्य परिवहन मंडळाच्या बस बुकिंगला प्राधान्य दिले जाते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वधू-वरांच्या पालकांना वऱ्हाड नेण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्ससह इतर वाहनांची बुकिंग करावी लागत आहे. अशातच रेल्वेने एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी पूर्ण ट्रेन किंवा काही डबे बुक करता येणार आहे. तुम्हाला जर लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी ट्रेन बुक करावयाची असेल तर जाणून घ्या बुकिंग कशी करावी…

ट्रेनने वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावी लागेल. त्यानुसार रेल्वेचा एक डबा बुक करण्यासाठी साधारण 50 ते 52 हजार रुपये लागतात. तर पूर्ण ट्रेन बुक करण्यासाठी लाखात खर्च येतो. बुकिंगची रक्कम अंतरावर ठरते. जेवढे जास्त अंतर तेवढी जास्त बुकिंग रक्कम आणि अंतर कमी असल्यास बुकिंग रक्कम देखील कमी द्यावी लागते. रेल्वे प्रशासन ही रक्कम तुमच्याकडून अनामत म्हणून घेते. त्यानंतर प्रवासाच्या काही दिवसानंतर जमा केलेली अनामत रक्कम परत मिळते.

रेल्वेचा एक डबा किंवा संपूर्ण ट्रेन बुक केल्यास वऱ्हाडांच्या सोयीसाठी ही गाडी एका रेल्वे स्टेशनवर किमान 7 मिनिटं थांबणार असे नियोजन रेल्वे विभागाकडून केले जाते. तर संपूर्ण बुक केलेली ट्रेन काही विशिष्ट स्टेशनवरच थांबते अथवा थेट नियोजित स्थळीच थांबवते. प्रवासा दरम्यान सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुविधा देखील पुरविल्या जातात.

नियोजित स्थळी तुम्हाला वऱ्हाड घेऊन जायचे असल्यास तुम्हाला बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ट्रेनचा 1 डबा किंवा संपूर्ण ट्रेन बुक करायची असल्यास रेल्वे स्टेशनवरील बुकिंग ऑफिस किंवा आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थावर जात या ठिकाणी तुम्हाला बुकिंग करता येऊ शकते. या ठिकाणी अनामत रक्कमसह प्रत्येक तिकिटावर 30 टक्के जास्त रक्कम देऊन बुकिंग करू शकतात. बुकिंगसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट फोटो सोबत जोडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही रेल्वेने वऱ्हाड घेऊन जाऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -