पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करत पुणेकरांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचं भूमीपूजन केलं होतं, आज त्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पणही करण्यात आलं. त्यामुळे पुणेकरांना आजपासूनच मेट्रोतून प्रवास करता येणार असून पुणेकरांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच मोदींना मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पांचंही भूमीपूजन केलं आहे. साबरमतीच्या धर्तीवर मुळा आणि मुठा नदी विकसीत होणार आहे. 44 किलोमीटरच्या या नद्यांपैकी 9 किलोमीटरच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार आहे. नदीकाठ बनवला जाईल. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरितपट्टे या नद्यांभोवती करण्यात येणार आहेत. यावेळी मोदींनी पुणेकरांना दरवर्षी नदी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. तसेच पुण्यासाठी पाच महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
1) मुळा मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार आहेत. मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतंय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल.
2) आज पुण्याला एक सुंदर भेट देण्यात आली आहे. आर के लक्ष्मण यांना समर्पित कलादालन तयार करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळालंय. वेगवान विकासासाठी आणि आतापर्यंत केलेल्या कामाचं पुणे प्रशासनाचं आणि पालिकेचं कौतुक आणि अभिनंदन करतो.
3) पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केलीये. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचं सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. आनंदनगरपर्यंत मी प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी करेल. ईज ऑफ लिव्हिंग वाढवेल. आज महाराष्ट्रात मेट्रोचं जाळ तयार होतंय. आजच्या या दिवशी माझा एक आग्रह आहे. पुणे आणि त्या सर्व शहरांतील लोकांना माझं सांगणं असेल की आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्याने तुमच्याच शहराला फायदा होणार आहे. 21व्या शतकातील भारताला आधुनिकही बनवायचं आणि त्याला नव्या सुविधाही जोडायच्या आहेत. भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करतोय.
4) कोरोना महामारीतूनही मार्ग काढत हा प्रकल्प पूर्ण झालाय. सोलर पॉवरचाही या मेट्रोसाठी वापर होतोय. 25000 टन कार्बन डायऑक्साईडचं एमिशन थांबणार आहे. या प्रकल्पाशी सोडल्या गेलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपलं योगदान पुण्यातील सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे. आपल्या देशात वेगानं शहरीकरण होतंय, हे तुम्हाला माहीत आहेत. 2030 पर्यंत आपली लोकसंख्या शहरी लोकसंख्या 60 कोटींच्याही पुढे जाईल. शहरांतील वाढती लोकसंख्या अनेक संधी निर्माण करतेय. पण त्यासोबतच आव्हानंही वाढताहेत.
5) इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकॉनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम, आधुनिक सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आम्ही पुढे जातोय. स्वच्छतेवरही फोकस राहायला हवा. अर्बन प्लानिंगशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींशी जोडलेलं असलं पाहिजे. प्रदूषणातून मुक्ती, कच्च्या तेलाची निर्भरता कमी करणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलवर भर देतोय. पुण्यातही यासाठी प्रयत्न सुरु केलेत. इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांचा फायदा होणार आहे. पालिकेनं अनेक कामं सुरु केली आहेत.