Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर

स्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर

बाईकला मागून ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात  झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील 8 महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले, तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात (Buldana) खामगावमधील घाटपुरी जवळ ही दुर्दैवी घटना धडली. रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटून परत येत असताना हा अपघात घडला. स्पीड ब्रेकरजवळ बाईकचा वेग कमी झाला असताना ट्रकने त्यांना मागून उडवलं. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर काही काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोंडी सोडवली.

स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आठ महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले. तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या घाटपुरी देवीजवळ रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ ट्राफिक जाम झाला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ वाहतूक कोंडी दूर केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -