गेल्या अनेक दिवसापासून कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान काल कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर वहागांव हद्दीत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी कराड तालुक्यातील वाहागावच्या हद्दीत कराड ते सातारा लेनवरून जात असलेल्या अज्ञात ट्रकने साताराकडे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील विश्वास रावसाहेब तोरसे (वय 36) व सुहानी शांताराम गायकवाड (वय 17) टोपोटी ग x रंडवाडी हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईन ऍम्ब्युलन्सने दोन्ही जखमींना सातारा येथे रुग्णालयात तात्काळ दाखल केले. तसेच हायवे हेल्पलाईन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, विक्रम सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.