Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीआयकरच्या निशाण्यावर राष्ट्रवादी! 40 ठिकाणी छापेमारी, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवरही रेड!

आयकरच्या निशाण्यावर राष्ट्रवादी! 40 ठिकाणी छापेमारी, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवरही रेड!

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेतेही आयकर विभागाच्या (IT) निशाण्यावर आले आहेत. आयटीकडून 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3 बहिणींच्या कंपन्यांवरही छापेमारी करण्यात आली आहे. याशिवाय या सर्च ऑपरेशनमध्ये 25 निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. काही पंचतारांकित हॉटेल्सचा देखील यात समावेश असल्याचे कळतंय. केवळ राज्यातच नाही तर कर्नाटकमधील बंगळुरूमध्येही आयटीकडून (Income Tax Department) सर्च ऑपरेशन सुरू आहे.

आयकर विभागाने पहाटे 5 वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी मुंबईत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवसैनिक संजय कदम यांचा समावेश आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे.त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली.

मीडिया रिपोर्टनुसार, याशिवाय राहुल कनाल यांच्या घरावर देखील आयकरने छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यासोबत पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा टाकून सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -