Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगघरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

दिल्लीतील शहदरा भागातील सीमापुरी येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कारण पोलिसांनी घरातच सुरू असलेल्या दहविक्रीच्या (Delhi Crime) व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून (Delhi police) गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि चार महिलांना अटक केली आहे. प्रिन्स हा या टोळीचा म्होरक्या आहे तर एक 38 वर्षीय महिला (lady Arrested) आणि 20 ते 30 वयोगटातील तीन मुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींबाबत माहिती समोर आली आहे.

सुरूवातील बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या आरोपींना पकडले आहे. हा धंदा किती दिवसांपासून सुरू होता याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. शाहदरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त आर. सत्यसुंदरम यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमापुरी येथील बी-84/4 दिलशाद कॉलनी येथील घरात शरीरविक्रीचा धंदा सुरू असल्याची माहिती रविवारी मिळाली होती. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. यानंतर संयुक्त पथक तयार करून दिलशाद कॉलनीत पोलिस पाठवण्यात आले. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

सुरूवातील पोलिसांनी बनावट ग्राहकाला प्रथम खात्री करण्यास सांगितले.बनावट ग्राहकाने घर गाठले आणि दरवाजा ठोठावला. त्यानंतर प्रिन्स नावाचा तरुण बाहेर आला. त्याच्याशी बोलून आरोपीने दोन हजारात सौदा करून बनावट ग्राहकाला घरात बोलावले. तेथे त्याची एका 38 वर्षीय महिलेशी ओळख करून देण्यात आली. यानंतर महिलेने तीन तरुणींना बनावट ग्राहकासमोर उभे केले. ग्राहकाने बाहेर थांबलेल्या टीमला माहिती दिली. त्यानंतर घरावर छापा टाकून पाच जणांना जागीच पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून सीमापुरी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात काय घडलं?

तपासादरम्यान पोलिसांना कळले की ज्या घरात हे सेक्स रॅकेट चालत होते ती मुख्य आरोपी महिला आहे. याशिवाय या मुली नोएडा, मुस्तफाबाद आणि यमुना विहार येथील रहिवासी आहेत. आरोपी प्रिन्स हाही दिलशाद कॉलनीत राहतो. यापूर्वी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील करकरडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलच्या स्पा सेंटरमध्येही धंदा सुरू होता. याची खबर मिळताच तेथे बनावट ग्राहक पाठवण्यात आला. खात्री झाल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून तरुणीसह दोघांना अटक करण्यात आली. स्पा सेंटरच्या रिसेप्शनवर आरोपींनी मसाजच्या नावाखाली बनावट ग्राहकाकडून पैसे उकळले. यानंतर आत असलेल्या तरुणीने त्याच्याकडे वेगळे पैसे मागितले. सध्या पोलीस याप्रकरणी स्पा सेंटर चालवणारी महिला आणि पंकज बब्बर नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पंकजच्या नावाने स्पा परवाना आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आनंद विहार पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -