Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरमध्ये मधमाश्यांच्या हल्या 10जण जखमी..!

कोल्हापूरमध्ये मधमाश्यांच्या हल्या 10जण जखमी..!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी बंधाऱ्या नजीक मधमाश्यांनी केलेल्या हल्यात सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. मधमाश्यांचा थवा या परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थासह वहानधारकांच्यात भितीचे वातावरण आहे. येथील ग्रामिण रुग्णालयात जखमींच्यावर उपचार सुरु आहेत.



मंगळवार (ता. 8) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण निकम व त्यांची पत्नी विद्या निकम (रा. हाजगोळी बुद्रक) या दुचाकीवरून आजऱ्याकडे निघाले होते. या वेळी बंधाऱ्यानजीक असलेल्या एका दगडाच्या गरड्यामध्ये असलेल्या मधमाश्यांच्या (bee) पोळ्यातील माश्या अचानकपणे उठल्या. त्यांनी निकम व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यामध्ये हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी तेथेच टाकून गावाकडे पळ काढला. त्यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय आजरामध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याच ठिकाणी शेताकडे जाणारे व वहानधारकांच्यावर या माश्यांनी हल्ला केला.

यामध्ये गोविंद होडगे, बाळू सुतार, तुकाराम पोटे (हाजगोळी बुदुक) व गोपाळ गिलबिले ( हाजोळी खुर्द) याचबरोबर पेद्रेवाडी येथील दोन वहानधारकही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या माश्यांचा थवा काल रात्री पर्यंत या परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थ व वहानधारकांनी या मार्गावरून आजऱ्याकडे ये- जा करणे बंद केले होते. काल दिवसभऱ या परिसरात भितीचे वातावरण होते. आज सकाळी देखील या परिसरातून जातांना वाहनधारकांनी दक्षता बाळगावी अशी सूचना ग्रामस्थ देत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -