Monday, December 23, 2024
HomenewsElection Result 2022 : पाच राज्यांचा आज निकाल

Election Result 2022 : पाच राज्यांचा आज निकाल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result 2022) गुरुवारी जाहीर होणार असल्याने या पाच राज्यांतील मतदारांसह अवघ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उत्तर प्रदेशात काय होणार, याबाबत लोकांना विशेष उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये या राज्यात भाजप बहुमताचे सरकार बनवेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.



उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये 2 टप्प्यांत, तर उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत एका टप्प्यात अलीकडेच मतदान पार पडले होते. पाचही राज्यांचा निवडणूक निकाल (Election Result 2022) गुरुवारी जाहीर होणार आहे.



मतदानोत्तर चाचण्यांचा विचार केला तर उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांत भाजपला सरकार बनविण्याची संधी मिळण्याची शक्यता असून, गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसदरम्यान काट्याची टक्‍कर आहे.


पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्ष सत्तेत येऊ शकतो, असे अंदाज विविध एक्झिट पोल्सनी वर्तविलेले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक निकालादिवशी मतदारराजा कुणाच्या बाजूने कौल टाकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मतदारराजाचा कौल कुणाला?

यूपी : उत्तर प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 403 इतके आहे. या राज्यात भाजप आणि समाजवादी पक्षादरम्यान खरी लढत झाली होती.
पंजाब : पंजाबमध्ये पंचरंगी लढती होत्या; पण येथे आम आदमी पक्षाचा दबदबा निर्माण होताना दिसत आहे.
गोवा : गोव्यात भाजपला बंडखोरी आणि अंतर्गत सुंदोपसुंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड, मणिपूर : उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसकडून भाजपला जोरदार टक्‍कर मिळेल, असे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -