Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसशेअर बाजारातील अपडेटः या दोन शेअरवर ठेवा लक्ष, चांगल्या कमाईची मिळेल संधी

शेअर बाजारातील अपडेटः या दोन शेअरवर ठेवा लक्ष, चांगल्या कमाईची मिळेल संधी

बीएसई निर्देशांक  बुधवारी 1306 अंकांनी वधरला आणि सकारात्मक दिशेने 54,731.00 पातळीवर बंद झाला. मिडकॅप निर्देशकांनेही गुंतवणुकदारांना दिलासा देत 530 अंकाची आगेकूच करत 22,961.84 अंकावर तो स्थिरावला. तर बीएसई स्माॉलकॅप 561 अंकांनी वधरला आणि 26,583.64 अंकावर थांबला. निफ्टी 50 इंडेक्स  16,000 अंकांचा टप्पा ओलांडून 331 अंकांनी वधरला आणि 16,345.35 अंकावर बंद झाला. बँक निफ्टी 657 अंकांच्या तेजीने 33,815.45 अंकांवर बंद झाला. एकंदरीत बुधवारी शेअर बाजाराचे चित्र असे होते. जानेवारीच्या सुरुवातीला शेअर बाजाराने उच्चांक गाठला होता. मात्र सध्या रशिया-युक्रेन युद्धाचे गडद ढग बाजारावर परिणाम करत आहेत. आजचा दिवस शेअर बाजारासाठी खास आहे. आज पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल  हाती येत आहे. या राज्यात सत्तांतर होते का सत्ताधारी मांड बसवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनता सत्ताधारी पक्षासोबत आहे की विरोधात या संकेतावर बाजारात मोठ्या घडामोडी दिसू शकतात. दुपारनंतर जसजसे निकाल हाती येतील बाजाराची स्थिती तशी पालटू शकते. त्यामुळे आज बाजारात ग्राहकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.l

लार्सन अँड टुब्रोः कंपनीला दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड(DMRC) कडून मोठा प्रकल्प मिळाला आहे. दिल्ली एमआरटीएसच्या चौथ्या टप्प्यातील भुयारी मेट्रो प्रकल्पाचे डिझाईन आणि निर्मितीचे काम कंपनीला मिळाले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश 5 किमीचे दोन भुयारी मार्गांचे डिझाईन आणि निर्मिती याचा समावेश आहे. या प्रकल्पाचा एक प्रमुख हिस्सा हा दक्षिण दिल्लीत आहे. 42 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

सिमेंट वेस्ट हिट रिकव्हरी बॉयलरसाठी कंपनीने मोठा प्रकल्प मिळवला आहे. श्री सिमेंटकडून 3.8 एमटीपीए क्लिंकर क्षमता असलेल्या राजस्थानमधील नवलगढ येथील प्लॅंसाठी ही ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरवर गुंतवणुकदारांनी लक्ष ठेवावे.

निफ्टी 50 इंडेक्समध्ये या स्टॉक्सवर गुंतवणुकदारांनी लक्ष ठेवावे. त्यातून त्यांना कमाईची संधी प्राप्त होऊ शकते. त्यात एशियन पेंट्स, रिलायंस इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रासह इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. तर बीएसई निर्देशांकात बजाज फिनसर्व, एशियन पेंट्स, रिलायंस इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा यांचा समावेश आहे. या शेअरमधील गुंतवणूक गुंतवणुकदारांना फायदा मिळवून देऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -