Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपरीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

परीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मार्च, एप्रिल हा परीक्षांचा महिना. या काळात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना काही समस्या उद्भवतात. त्या समस्या सोडविण्यासाठी काही समुपदेशक नियुक्त (Appointed Counselor) केले जातात. हे समुपदेशक विद्यार्थी तसेच पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही.


परीक्षा म्हटली की काही विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते, ही भीती घालविण्याचे काम हे समुपदेशक करत असतात. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची धामधूम सुरू आहे. या कालावधीत नागपूर विभागात जिल्हास्तरावर (District Level in Nagpur Division) विद्यार्थी व पालकांच्या परीक्षेविषयीच्या समस्या, तक्रारी (Problems, Complaints) सोडविण्यासाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. समुपदेशन केंद्र परीक्षेपूर्वी एक आठवडा सुरू झाले आहे. परीक्षेच्या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत समुपदेशन सुरू राहील.

खाली दिलेल्या क्रमांकावर फोन करा
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे एकूण 12 समुपदेशक शंकानिरसन करतील. नागपूर येथील विशाल गोस्वामी, शारदा महाविद्यालय (8275039252) व प्रतिमा मोरे, बालाजी हायस्कूल हिंगणा (9028066633), वर्धा जिल्ह्यातील पी. के. शेकार, यशवंत विद्यालय, ( 9766917338) व वि. दा. पाटील, इंदिरा हायस्कूल (9823438205) हे समुपदेशन करतील. भंडारा जिल्ह्यातील गायत्री भुसारी, समर्थ महाविद्यालय (9011062355) व नरेंद्र वाघमारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (9405517541) तर गोंदिया जिल्ह्यातून मिलिंद रंगारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्था (9404860735), एल. एच. लांजेवार, श्री गुरुदेव विद्या मंदिर (7507099136) हे समुपदेशन करतील. चंद्रपूर जिल्ह्यातील मातोश्री विद्यालयाचे सतीश पाटील (9421914353) व आर. एन. रहाटे (7588890187) आणि गडचिरोली जिल्ह्यात डी. एम. जवंजाळ, रेणुकाबाई उके हायस्कूल ( 9421817089) व ए. एल. नुतीलकंठावार, लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल (9421732956) हे समुपदेशन करतील. काही समस्या किंवा तक्रारी असल्यास संपर्क करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -