Sunday, December 22, 2024
HomeसांगलीSangli :  धमकी देऊन सांगलीत महिलेवर बलात्कार

Sangli :  धमकी देऊन सांगलीत महिलेवर बलात्कार

संजयनगर परिसरात राहणार्‍या एका महिलेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. महिलेचे मोबाईलवर चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित महिलेने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आसिफ मीरासाहेब गडेकर (रा. उर्मिलानगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, संशयित गडेकर हा पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. 21 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तो गेला. दार बंद करून तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यावेळी गडेकर याने मोबाईलवर अत्याचाराचे चित्रीकरण केले. व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने देत 31 सप्टेंबर 2021 ते 8 मार्च 2022 या कालावधीत त्याने वेळोवेळी बलात्कार केला. त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने गुरुवार दि. 10 मार्च रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित गडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -