ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध शुक्रवारी कोल्हापुरात व्यक्त केला जात आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने तात्काळ परत बोलवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर पुरोगामी शाहूंच्या नगरीत महापुरुषांचा अपमान कदापी सहन करून घेणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात भैय्या माने, क्रांतीकुमार पाटील, डॉ. डी. आर. मोरे. प्राचार्य व्ही. एम. पाटील, डॉ. प्रताप पाटील, धैर्यशील पाटील, डॉ. भारती पाटील, शुभांगी गावडे, डॉ. मेघा गुळवणी आदी सहभागी झाले होते.