ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सदनात अर्थसंकल्प २०२१-२२ चे वाचन केलं आहे. या अहवालानुसार १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर, देशाच्या अर्थव्यवस्थेच ८.९ टक्क्यांची वाढीची अपेक्षा आहे. इतकंच नाही, कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. असं असलं तरी, यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य मंत्रीमंडळातील महत्वाच्या खात्यांना किती निधी देण्यात आला आहे, त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे…
यंदाच्या अर्थसंकल्पात खालील महत्वाच्या खात्यांसाठी दिलेला निधी…
शालेय शिक्षण विभाग : २ हजार ३५४ कोटी
जलसंपदा विभाग : १३ हजार २५२ कोटी
आरोग्य विभाग : ११ हजार कोटी
गृह विभाग : १ हजार ८९६ कोटी
ऊर्जा विभाग : ९ हजार ९२६ कोटी
पर्यटन विभाग : १ हजार ७०४ कोटी
सामाजिक न्याय विभाग : २ हजार ८७६ कोटी
आदिवासी विभाग : ११ हजार १९९ कोटी ॉ
बांधकाम विभाग : १५ हजार ६७३ कोटी
महिला व बाल विकास विभाग : २ हजार ४७२ कोटी
उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण : १ हजार ६९९ कोटी
परिवहन खातं : ३ हजार ३ कोटी
नगर रचना विभाग : ८ हजार ८४१ कोटी